dr.satish best web design developer for mac

कौलगे ग्रामपंचायत :

कोल्हापूर जिल्हा हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत प्रगत समजला जाणारा जिल्हा आहे. अशा या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात 2486 लोकांची वस्ती असलेलं लहान पण सुंदर अस गाव म्हणजे आमचं कौलगे गाव होय. तसेच गावात 26 मे 1952 रोजी प्रथम ग्रामपंचायत अस्तित्वात आली असून गावात ग्रामपंचायतीने लोकांच्या हितासाठी शासनाच्या खूप योजना राबविल्या आहेत. गावाची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी गावामध्ये  स्वच्छता अभियान चालू केले असून, गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

कौलगे ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 610 असून गावाची लोकसंख्या 2,486 इतकी आहे. एकूण घरांची संख्या 800 असून ती 3 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.

सरपंच
श्री. शिवाजी भैरू जाधव

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. प्रभावती भैरू कांबळे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. श्रीकांत अनंत सोनार

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Koulage Grampanchayat
A/p Koulage Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416235

CONTACTS
Phone :7744068691

Office : 02327-243032